तिघांना पोलिस खात्यात, सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष; ५३ लाख रूपयांनी फसवणूक

By नितिन गव्हाळे | Published: November 29, 2023 08:38 PM2023-11-29T20:38:10+5:302023-11-29T20:38:28+5:30

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

The lure of giving employment to the three in the police department, in the army 53 lakhs fraud | तिघांना पोलिस खात्यात, सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष; ५३ लाख रूपयांनी फसवणूक

तिघांना पोलिस खात्यात, सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष; ५३ लाख रूपयांनी फसवणूक

अकोला: आपण पोलिस खात्यात असून, मोठ्या अधिकाऱ्यांशी संबध आहेत. असे सांगुन गावातील ओळखीच्या तिघांना पोलिस दलात आणि सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५३ लाख रूपयांनी तिघा जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बाळापूर तालुक्यातील एका गावातील तक्रारीनुसार ते होमगार्ड म्हणून काम करीत होते. त्यांच्याच गावातील आरोपीने त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरे असल्याचे भासवून नोकरी करीता वारंवार नगदी व ऑनलाइनद्वारे एकूण १८ लाख रूपये घेतले. दरम्यान त्याने गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलिस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही २० लाख ४२ हजार रूपये घेऊन फसवणूक केली. तसेच आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकास आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून एकूण १५ लाख रुपये घेवून फसवणूक केली.

तिघांनीही याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार चौकशी करून चौकशी अहवाल तयार करून पोलिस अधीक्षकांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उरळ पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला.

५३ रूपयांनी फसवणूक केल्या प्रकरणात तक्रार आल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येईल.
-गोपाल ढाेले, ठाणेदार उरळ

Web Title: The lure of giving employment to the three in the police department, in the army 53 lakhs fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.