बिहारमधून हरविलेल्या बालीकेला पोहचविले स्वजिल्ह्यात
By रवी दामोदर | Published: April 7, 2024 06:16 PM2024-04-07T18:16:53+5:302024-04-07T18:17:06+5:30
अकोला : बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातून हरविलेली व अकोला रेल्वेस्थानकावर सापडलेल्या एका १६ वर्षीय बालीकेला तिच्या स्वजिल्ह्यात पाठविण्यातजिल्हा बाल ...
अकोला: बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यातून हरविलेली व अकोला रेल्वेस्थानकावर सापडलेल्या एका १६ वर्षीय बालीकेला तिच्या स्वजिल्ह्यात पाठविण्यातजिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले. बालिकेला तिच्या स्व जिल्हयातील बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
अकोला रेल्वेस्थानकावर एक बालीका भटकत असताना रेल्वे चाईल्ड लाईन चमूला आढळून आली. काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातुन तीला गायत्री वालीकाश्रम येथे दाखल करण्यात आले. समुपदेशीका भाग्यश्री घाटे यांनी तीच्या कडुन माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बालीकेची भाषा समजण्यास अडचण जात होती त्यामुळे त्यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर यांना माहीती दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर व बालकल्याण समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारी भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीला त्या बालीकेशी वार्तालाप करण्यात पाचारण केले. तेव्हा तीने बेगुलसराय जिल्हयातील एका गावातील असल्याची माहीती दिली. इंटरनेटवर तीचे गाव सापडत नव्हते.
त्यामुळे बेगुसराय जिल्हयातील बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षांशी संपर्क करण्यात आला. तेव्हा पासुन बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड. अनिता गुरव बेगुसराय बालकल्याण समितीच्या संपर्कात होत्या. तीला बेगुलसराय येथे सोडण्याकरीता रेल्वेचाइल्ड लाइनचे स्वप्निल शिरसाट, अपर्णा सहारे, सुनिता अंभारे यांनी पुढाकार घेतला. बालीकेला बेगुलसराय येथे बालगृहात दाखल करण्यात आले. या सर्व प्रकीयेत चाइल्ड लाइन समन्वयीका हर्षाली गजभीये, स्वप्निल शिरसाट, अपर्णा सहारे, सुनिता अंभारे बालकल्याण समिती अकोला, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन अकोला, गायत्री बालीकाश्रम या सर्वांचे सहकार्य लाभले.