कुटूंबातील एकुलत्या एक मुलाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन
By नितिन गव्हाळे | Published: April 30, 2023 01:36 PM2023-04-30T13:36:37+5:302023-04-30T13:36:47+5:30
पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.
अकोला: मी जे काही कृत्य केले. ते अत्यंत वाईट आहे. माझ्या या कृत्यामुळे माझ्या आईवडलांना शरमेने मान खाली घालावी लागली. अनेकांचा रोष पत्करावा लागला. याचा मला खूप पश्चाताप होत आहे. असे चिठ्ठीत लिहून, आईवडलांना एकुलता एक मुलगा असलेल्या २० वर्षीय युवकाने शनिवारी दुपारी गुडधी मरघट रेल्वे मार्गावर रेल्वेगाडीसमोर स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपविली.
सिव्हिल लाइन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिसा-मासा येथील स्वराज्य दत्तात्रय हगवणे(२०) याने दोन पानांची चिठ्ठी लिहून, त्यात मी अत्यंत वाईट कृत्य केले आहे. माझ्या मैत्रिणीला फसविले आहे. माझ्या कृत्यामुळे माझ्या आईवडलांना शरमेने मान खाली घालावी. याचा मला पश्चाताप होत आहे. असे लिहून, त्याने शनिवारी दुपारी गुडधीजवळील लोहमार्गावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, आत्महत्या केली. याप्रकरणात सिव्हील लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.
दोन पानांची लिहली चिठ्ठी
मृत्यूपूर्वी स्वराज हगवणे(२०) याने दोन पानांची चिठ्ठी लिहून, त्यात पश्चाताप व्यक्त केला आहे. स्वराज याच्याविरूद्ध वर्षभरापूर्वी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो बार्शीटाकळीतील एका महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षाला शिकत होता. स्वराज आईवडलांना एकटाच मुलगा होता. त्याच्या आत्महत्येमुळे हगवणे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.