मुलींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकही निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:33 AM2024-08-22T07:33:27+5:302024-08-22T07:35:24+5:30

हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीने केली आहे.

The teacher who abused the girls was dismissed, the head of the center and the principal were also suspended | मुलींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकही निलंबित

मुलींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकही निलंबित

अकोला : शाळेतील सहा मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाने सेवेतून बडतर्फ केले आहे, तर केंद्र प्रमुख राजेश तायडे आणि मुख्याध्यापक रवींद्र समदूर यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

उरळ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा  मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला पाेलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठाेकल्या. एका मुलीच्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने दोषींवर तातडीने कारवाई केली आहे.

आरोपी शिक्षकाला गजाआड करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बालकल्याण समिती व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही बसविण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. आवश्यकतेनुसार निधीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीने केली आहे.

नराधम शिक्षकाचे कारनामे...
मे महिन्यात सुट्यांच्या काळात शिकवणीच्या नावाखाली मुलींना बोलवायचा खोलीवर. 
जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर याच मुलींचा सुरू केला लैंगिक छळ. 
मुलींना त्याच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ आणि फोटोही दाखवायचा. 
वर्गातील मुलांना बाहेर काढून मुलींशी त्यांच्या लैंगिंक बाबींविषयी चर्चा करीत होता.

Web Title: The teacher who abused the girls was dismissed, the head of the center and the principal were also suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.