अकाेल्यात जिल्हा परिषदेचे पथक करणार पुन्हा ‘गुड मार्निंग’

By राजेश शेगोकार | Published: April 18, 2023 04:32 PM2023-04-18T16:32:43+5:302023-04-18T16:32:55+5:30

आता पुन्हा गावाच्या वेशीबाहेर अधिकारी कर्मचारी गुड माॅर्निंग पथक दृष्टीस येणार आहे. 

The Zilla Parishad team will perform Good Morning again in Akola open washrooms | अकाेल्यात जिल्हा परिषदेचे पथक करणार पुन्हा ‘गुड मार्निंग’

अकाेल्यात जिल्हा परिषदेचे पथक करणार पुन्हा ‘गुड मार्निंग’

googlenewsNext

अकाेला :  अकाेल्याच्या ग्रामिण भागात शाैचालये असूनही अनेक ग्रामस्थ उघड्यावर बसत असल्याने पुन्हा एकदा हगदणरीमुक्तीचा जागर हाेणार आहे. जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत उघड्यावर शाैचास जाणाऱ्याविराेधात कारवाईसाठी गुड माॅर्निंग पथक सुरू करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा गावाच्या वेशीबाहेर अधिकारी कर्मचारी गुड माॅर्निंग पथक दृष्टीस येणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता ग्रामीण विभागाच्या वतीने गावे हागणदारी मुक्त व्हावेत यासाठी पायाभूत सर्व्हेक्षणा नुसार जिल्हाभरात शौचालय बांधकाम करण्यात आले. मात्र काही गावात शौचालयाचा वापर न करता नागरिक उघड्यावर बसत असून घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याचं वास्तव जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर यांनी सभेसमोर मांडून लोटाबहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सुरू करण्याचा ठराव मांडला.

सर्व सदस्यांनी विषयावर चर्चा करून एक मताने ठराव मंजूर  करण्यात आला  जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता ग्रामीण विभागाने गावे हागणदारी मुक्त,स्वच्छ व्हावेत यासाठी जिल्हा ,तालुका आणि गांव पातळीवर गुड मॉर्निंग पथक सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई अढाऊ यांनी जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत दिले.

Web Title: The Zilla Parishad team will perform Good Morning again in Akola open washrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला