अडसूळ येथे चोरी; दागिन्यांसह ३.७२ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:51+5:302021-06-24T04:14:51+5:30

तालुक्यातील अडसूळ येथील रहिवासी आकाश दयाराम महाल्ले (२५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या आईच्या उपचारार्थ खामगाव येथे गेले होते. ...

Theft at Adsul; Lampas looted Rs 3.72 lakh along with jewelery | अडसूळ येथे चोरी; दागिन्यांसह ३.७२ लाखांचा ऐवज लंपास

अडसूळ येथे चोरी; दागिन्यांसह ३.७२ लाखांचा ऐवज लंपास

Next

तालुक्यातील अडसूळ येथील रहिवासी आकाश दयाराम महाल्ले (२५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या आईच्या उपचारार्थ खामगाव येथे गेले होते. २२ जून रोजी परिवारासह नेहमीप्रमाणे हॉलमध्ये झोपले होते. रात्रीच्या सुमारास फिर्यादी लघुशंकेला उठले असता, त्यांना बेडरूमचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. पत्नीला सांगून पाहणी केली असता खोलीत साहित्य, कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे उघडकीस आले. अज्ञात चोरट्याने कपाटातील ७०.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत दोन लाख ८२ हजार रुपये व नगदी ९० हजार रुपये असा एकूण ३ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात तेल्हारा पोलिसात फिर्याद नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

Web Title: Theft at Adsul; Lampas looted Rs 3.72 lakh along with jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.