चार लाखांच्या तेल चोरीचा प्रयत्न फसला!
By admin | Published: October 27, 2016 03:41 AM2016-10-27T03:41:29+5:302016-10-27T03:41:29+5:30
दोघे गजाआड; २७ बॅरल तेलासह ट्रक जप्त
अकोला, दि. २६-महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक ३ मध्ये असलेल्या समीर ऑइल इंडस्ट्रीजमधील २७ बॅरल तेल चोरुन ते एका ट्रकमध्ये नेण्यात येत असताना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री ट्रक पकडला. तेल चोरणार्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी चार लाख रुपयांचे २७ बॅरल तेल आणि ट्रक जप्त केला आहे.
फेज क्रमांक ४ मधील समीर ऑइल इंडस्ट्रीज येथून बबलु यादव आणि नारायण यादव हे दोन चोरटे चार लाख रुपयांचे २७ बॅरल खाद्य तेल एका ट्रकमध्ये मंगळवारी मध्यरात्री भरत होते. या चोरट्यांनी २७ बॅरल ट्रकमध्ये ठेवल्यानंतर ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच यावेळी गस् तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. दोन्ही चोरट्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणले, या ठिकाणी कसून चौकशी करताच दोन्ही चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांच्या तेल चोरीची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांकडून चार लाख रुपयांचे तेल आणि चार लाख रुपयांचा ट्रक जप्त केला. ही कारवाई एमआयडीसीचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस कर्मचार्यांनी केली.