ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न; तीन महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:21 AM2017-08-05T02:21:18+5:302017-08-05T02:22:18+5:30

अकोला : गोरक्षण रोडवरील विसपुते नामक इसमाच्या  ज्वेलर्समधून १२ हजार रुपयांचे दागिने चोरणार्‍या तीन  महिलांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

Theft of Jewelers; Three women are in custody | ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न; तीन महिला ताब्यात

ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न; तीन महिला ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमोद दत्तराय विसपुते यांचे गोरक्षण रोडवर ज्वेलर्सचे दुकान दागिने चोरणार्‍या तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील विसपुते नामक इसमाच्या  ज्वेलर्समधून १२ हजार रुपयांचे दागिने चोरणार्‍या तीन  महिलांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.  प्रमोद दत्तराय विसपुते यांचे गोरक्षण रोडवर ज्वेलर्सचे दुकान  आहे. २ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास विसपुते यांचा पु तण्या शुभमने ज्वेलर्स दुकान उघडले. त्यानंतर या ज्वेलर्समध्ये  तीन महिला दागिने खरेदीसाठी आल्या. त्यांनी ३५0 रुपये किम तीचे चांदीचे जोडवे खरेदी केले. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी  सकाळी काका-पुतण्यांनी दुकानातील स्टॉक तपासला असता,  जोडव्यांचे १८ जोड गायब असल्याचे आढळून आले. या  जोडव्यांची किंमत १२ हजार रुपये आहे. त्यानंतर त्यांनी  दुकानातील सीसी कॅमेर्‍यातील फुटेज पाहिले असता, यामध्ये ३  ऑगस्ट रोजी तीन महिलांनी जोडवे चोरल्याचे दिसून आले. या प्रकरणी विसपुते यांनी  दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर  महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Theft of Jewelers; Three women are in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.