पारस येथे चोरीचे सत्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:19 AM2017-07-27T03:19:07+5:302017-07-27T03:19:11+5:30

पारस : येथील एकतानगरस्थित देशी दारू दुकानातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीची शाई वाळत नाही, तोच येथील अत्यंत रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकानांसह विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी २५ जुलैच्या मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केला.

theft in paras! | पारस येथे चोरीचे सत्र सुरूच!

पारस येथे चोरीचे सत्र सुरूच!

Next
ठळक मुद्देदोन दुकाने फोडली: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
पारस : येथील एकतानगरस्थित देशी दारू दुकानातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीची शाई वाळत नाही, तोच येथील अत्यंत रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकानांसह विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी २५ जुलैच्या मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केला. एकाच दिवशी झालेल्या तीन चोºयांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील टी-पॉइंट चौकात असलेल्या ग्रामीण बँकेत २५ जुलैच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला व चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना तिजोरी फोडता आली नाही. त्यानंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या पारस कॉर्नर या दुकानात प्रवेश करून २,४९० रुपये लंपास केले. पुढे चोरट्यांनी आपला मोर्चा रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या यादव मार्ट या दुकानाकडे वळविला. तेथे सुद्धा दुकानाचे दोन्ही शटर वाकवून दोन हजार रुपये नगदी लंपास केले. अलीकडच्या काळात पारस व परिसरात चोºयांचे प्रमाण खूप वाढले आहे. महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र पळविणे, बकºया चोरणे, मोबाइल लंपास करणे यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. यासाठी पोलिसांची संख्या वाढणे गरजेचे झाले आहे.

अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
ग्रामीण बँकेमध्ये सुरक्षिततेच्या कोणत्याच सुविधा नसल्याने अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सीसी कॅमेरा, सुरक्षा गार्ड वा अलार्म अशी कुठलीच व्यवस्था येथे नाही. बँकेचे जनरल मॅनेजर खाडे यांना याबाबत विचारले असता, लवकरच व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण
अकोला येथील श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच ठाणेदार मिर्झा यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या. याप्रसंगी गावचे पोलीस पाटील गजाननराव दांदळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेळके यांनीही भेट दिली. यावेळी ग्रामस्थांची तोबा गर्दी जमली होती.

चोरीची पद्धत सारखी
दुकानास तसेच बँकेस असलेल्या कुलपांना हात न लावता जॅकचे सहाय्याने शटर उघडून चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये दुकानाच्या शटरचे खूप नुकसान झाले. शटर अक्षरश: वाकले.ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी नहूश सुधीर फडके यांचे फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४६१, ३८०, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय संजय सिरसाठ करीत आहेत.

Web Title: theft in paras!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.