दुचाकीच्या डिक्कीतून पैसे लंपास करणारा निघाला मित्रच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:26 PM2019-02-22T13:26:40+5:302019-02-22T13:26:45+5:30
अकोला: दुचाकीच्या डिक्कीतून ४0 हजार रुपयांची रोख लंपास झाली होती. ही रक्कम दुसऱ्या कोणीच नाही, तर चक्क मित्रानेच लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. खदान पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याकडील रोख जप्त केली.

योगेश गणेश सराग यांच्या तक्रारीनुसार त्यांची जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ पॅथॉलॉजी लॅब आहे. गुरुवारी त्यांना कामासाठी पैशांची गरज असल्याने, त्यांनी एटीएममधून चाळीस हजार रुपयांची रोख काढली आणि ही रोख दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून दिली. सराग हे लॅबमध्ये गेल्यावर त्यांचा मित्र शिवानंद मनोहर दुरवेकर याने दुजाकीच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम काढली आणि पसार झाला. काही वेळानंतर सराग यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितली असता, रक्कम नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी लगेच खदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नावकार, अरखराव, गोपीलाल मावळे, राजेंद्र तेलगोटे, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे यांनी तपास करून काही तासांतच चोरट्या मित्रास अटक केली आणि त्याच्याकडील रोख जप्त केली. (प्रतिनिधी)