मंदिरात चोरी; दानपेटीतील मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:28+5:302021-09-25T04:18:28+5:30
पिंपळखुटा : गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या चांगेफळ फाट्याजवळील मंदिरात बुधवारी (दि. २२) मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीसह ...
पिंपळखुटा : गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या चांगेफळ फाट्याजवळील मंदिरात बुधवारी (दि. २२) मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीसह ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिमंदिराचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वामनराव देशमुख यांनी चान्नी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केल्याचे सांगितले.
चान्नी येथील पोलिसांकडून याप्रकरणात ‘त्या’ व्यक्तींकडून कोणतीही तक्रार प्राप्त न झाल्याचे म्हणणे आहे. परिसरात चोरीचे सत्र सुरूच असून, तीन महिन्यांपूर्वी पिंपळखुटा येथील तीन घरे फोडून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे चान्नी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
---------
चोरीप्रकरणी कोणतीही तक्रार प्राप्त न झाल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
- राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी
--------------
चांगेफळ फाट्याजवळील मंदिरात चोरी झाल्याप्रकरणी तक्रार दिली असून, अद्यापही एफआयआरची प्रत मला दिलेली नाही.
- जितेंद्र देशमुख, तक्रारदार