...तर लाॅन, मंगल कार्यालयांवर हाेणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 10:57 AM2021-02-21T10:57:10+5:302021-02-21T10:57:16+5:30

Akola News केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवीत आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे.

... then action will be taken against Lawn and marriage halls | ...तर लाॅन, मंगल कार्यालयांवर हाेणार कारवाई

...तर लाॅन, मंगल कार्यालयांवर हाेणार कारवाई

Next

अकाेला : जिल्हा प्रशासनाने साेशल डिस्टन्सिगच्या नियमावलीनुसार केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवीत आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे. ही बाब गांभीर्याने घेत मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी महापालिका क्षेत्रातील मंगल कार्यालये, लाॅन, हाॅटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी आयाेजित लग्न साेहळा, इतर कार्यक्रमांमध्ये साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आढळल्यास आयाेजकांसह हाॅटेल, मंगल कार्यालयांच्या संचालकांवर कारवाईचे निर्देश गठित केलेल्या पथकांना जारी केले आहेत. शहरात दिवसेंदिवस काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत हाेणारी वाढ चिंताजनक मानली जात आहे. अशा स्थितीत काेराेनाच्या नव्या स्ट्रेनच्या शक्यतेने जिल्हा व महापालिका प्रशासनाची झाेप उडाली आहे. यापृष्ठभूमीवर राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, जिल्हा आराेग्य यंत्रणा व महापालिकेला खबरदारी बाळगण्याचे निर्देश जारी केले आहेत. मागील काही दिवसांत शहराच्या विविध भागात काेराेनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येत वाढ झाली असून ही धाेक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, काेराेनाच्या ‘मिशन बिगेन’अंतर्गत नियमावलीचे पालन करीत जिल्हा प्रशासनाने केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांना परवानगी दिली. प्रशासनाच्या परवानगीचा गैरफायदा उचलत मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅनमध्ये वधू व वर पित्याकडील नातेवाइकांची खच्चून गर्दी हाेत असल्याचे चित्र आहे. ही गर्दी काेराेनाच्या प्रसारासाठी हातभार लावत असल्याने साेहळ्यांचे आयाेजन करणाऱ्यांसह लाॅन, मंगल कार्यालये व हाॅटेल संचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त निमा अराेरा यांनी जारी केले आहेत.

 

नियम माेडणाऱ्यांवर फाैजदारी

काेराेना विषाणूची लागण हाेऊन शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब ध्यानात घेता लग्न साेहळ्यात नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास लाॅन, मंगल कार्यालय व हाॅटेल संचालकांना पहिल्या वेळी दंड आकारण्याचे आयुक्त निमा अराेरा यांचे निर्देश आहेत. वारंवार उल्लंघन केल्याचे आढळल्यास थेट फाैजदारी करण्याची सूचना केली आहे.

 

अकाेलेरांनाे काळजी घ्या!

शहरात काेराेनाची लाट आली असताना नागरिक साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता बाजारपेठेत फिरत आहेत. आपसांत किमान चार फूट अंतर राखणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याने काेराेनाची लागण हाेत आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला निर्माण झालेला धाेका पाहता अकाेलेकरांनी काळजी घेऊन नियमांचे तंताेतंत पालन करण्याचे आवाहन आयुक्त निमा अराेरा यांनी केले आहे.

 

Web Title: ... then action will be taken against Lawn and marriage halls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.