...तर लाॅन, मंगल कार्यालयांवर हाेणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:35 AM2021-02-21T04:35:38+5:302021-02-21T04:35:38+5:30
नियम माेडणाऱ्यांवर फाैजदारी काेराेना विषाणूची लागण हाेऊन शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब ...
नियम माेडणाऱ्यांवर फाैजदारी
काेराेना विषाणूची लागण हाेऊन शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब ध्यानात घेता लग्न साेहळ्यात नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास लाॅन, मंगल कार्यालय व हाॅटेल संचालकांना पहिल्या वेळी दंड आकारण्याचे आयुक्त निमा अराेरा यांचे निर्देश आहेत. वारंवार उल्लंघन केल्याचे आढळल्यास थेट फाैजदारी करण्याची सूचना केली आहे.
अकाेलेरांनाे काळजी घ्या!
शहरात काेराेनाची लाट आली असताना नागरिक साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता बाजारपेठेत फिरत आहेत. आपसांत किमान चार फूट अंतर राखणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याने काेराेनाची लागण हाेत आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला निर्माण झालेला धाेका पाहता अकाेलेकरांनी काळजी घेऊन नियमांचे तंताेतंत पालन करण्याचे आवाहन आयुक्त निमा अराेरा यांनी केले आहे.
...फाेटाे निमा अराेरा...