..तर सरकारला वठणीवर आणता येईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:35 AM2017-10-16T02:35:08+5:302017-10-16T02:35:32+5:30
आपल्या सर्वांचे सहकार्य असेच मिळाले तर सरकारला वठणीवर आणू, असा इशारा भाजप नेते माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नोटाबंदी व ‘जीएसटी’चा अर्थव्यवस्थेच्या वास् तविकतेवर लिखाण केल्याने सरकारला हादरा बसला. हे आ पले मत जनतेला पटले आहे म्हणूनच देशभरातून माझ्यासोबत संपर्क साधला जात आहे. अकोल्यातही त्यामुळेच मला बोलाविण्यात आले असून येथे प्रथमच जाहीरपणे बोलत आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य असेच मिळाले तर सरकारला वठणीवर आणू, असा इशारा भाजप नेते माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला.
विदर्भ चेंबर्स ऑफ कॉर्मसच्या अकोला शाखेच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी जागर मंच अकोला आणि विदर्भ चेंबर्सच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रास्ताविक निकेश गुप्ता यांनी केले. अ र्थव्यवस्थेवर कॅटचे सदस्य अशोक डालमिया यांनी विवेचन केले. मंचावर शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे, चेंबर्सचे अध्यक्ष विजय पनपालिया प्रामुख्याने उपस्थित होते.
जीएसटीच्या अंमलबजावणीआधी वस्तू-सेवांवरील कर निश्चि तीचे धोरण ठरवायला हवे होते, तसे झाले नाही. जीएसटी परिषदेच्या पहिल्याच बैठकीत कीटकनाशकावर १८ टक्के कर लादला, नंतर पाच टक्के केला.
जीएसटीमुळे देशातील व्यापार आणि दुकाने बंद पडत आहेत. १३0 कोटी लोकसंख्येला हाताळण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा अपयशी ठरली आहे. सर्वांचे सहकार्य असेच मिळाले तर भविष्यात मी पुन्हा अकोल्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी व्यापार्यांना दिले. याप्रसंगी अशोक गुप्ता, पंकज कोठारी, रमाकांत खेतान, कासम अली, राजू मुलचंदानी, श्रीकांत पिसे, अँड. सुभाष ठाकूर, संजय तुलशान, कृष्णा अंधारे,राजू पाटील,अँड. मोदी आदी व्यापारी-उद्योजक मोठय़ा प्रमाणात उ पस्थित होते.