...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

By आशीष गावंडे | Published: November 1, 2022 02:06 PM2022-11-01T14:06:15+5:302022-11-01T14:20:06+5:30

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे.

then the tension of BJP will increase in the district meeting on Matदshree A sign of alliance with the vanchit bahujan aghadhi akola prakash ambedkar | ...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

Next

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे. साेमवारी मुंबईत माताेश्रीवर अकाेला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाेबत पार पडलेल्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबत आघाडी करण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यातील सत्तेत अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या महाविकास आघाडीला फुटीचे ग्रहण लागले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावत भाजपच्या मदतीने सत्तेत उलटफेर घडविला. हा शिवसेनेसाठी माेठा धक्का मानला जात असतानाच शिंदे गटाने शिवसेनेवरही हक्क सांगितला. वर्तमानस्थितीत शिवसेनेची दाेन शकले निर्माण झाली असली तरी दुसरीकडे खचून न जाता उद्धव ठाकरे पक्ष संघटनेसाठी जाेमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.

साेमवारी त्यांनी माताेश्रीवर पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. यावेळी आगामी महापालिका, लाेकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या रणनितीवर सविस्तर चर्चा पार पडल्याची माहिती आहे. शिंदे गटापेक्षा भाजपला राेखण्यासाठी प्रभावी राजकीय व्युहरचनेची गरज असल्याचा सूर बैठकीत उमटला. केंद्रीय यंत्रणा तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या आडून पक्षातील आमदारांना नाहक गाेवल्या जात असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. बैठकीत शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांच्यासह संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हाप्रमुख तथा आ.नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते. 

महाविकास आघाडी कायम राहील
राज्यातील विराेधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. भाजपच्या दबावतंत्राला बळी न पडता ज्या प्रमाणे सेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली, हीच आघाडी लाेकसभा,विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडल्याची माहिती आहे. 

तीन मतदार संघात हाेतील उलटफेर
जिल्ह्यात भाजपच्या पाठाेपाठ वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत मानले जाते. याठिकाणी वंचितसाेबत आघाडीचा प्रयाेग झाल्यास वर्तमानस्थितीत मुर्तिजापूर, अकाेट व अकाेला पश्चिम विधानसभा मतदार संघात उलटफेर हाेतील,असा कयास लावल्या जात आहे. लाेकसभेची जागा वंचितच्या पारड्यात गेल्यास भाजपच्या अडचणीत वाढ हाेण्याची शक्यता आहे.

Web Title: then the tension of BJP will increase in the district meeting on Matदshree A sign of alliance with the vanchit bahujan aghadhi akola prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.