शहरात गणेश मंडळांची संख्या ३१०, अधिकृत वीजजोडणी केवळ १६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:15+5:302021-09-16T04:24:15+5:30

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी महापालिका क्षेत्रात जवळपास ३१० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव ...

There are 310 Ganesh Mandals in the city, only 16 official electricity connections | शहरात गणेश मंडळांची संख्या ३१०, अधिकृत वीजजोडणी केवळ १६

शहरात गणेश मंडळांची संख्या ३१०, अधिकृत वीजजोडणी केवळ १६

Next

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी महापालिका क्षेत्रात जवळपास ३१० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी दिली जाते. यासाठी महावितरण घरगुती दर आकारते. गणेशोत्सवापूर्वी महावितरणकडून मंडळांना तसे आवाहनही करण्यात येते; परंतु अनेक मंडळे अधिकृत वीजजोडणी घेण्याकडे दुर्लक्षच करतात. यंदाही हाच कल दिसून आला आहे. यावर्षी केवळ १६ गणेशोत्सव मंडळांनी अर्ज करून तात्पुरत्या स्वरूपाची वीजजोडणी घेतल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

म्हणून मंडळे करतात दुर्लक्ष

महावितरणकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीजजोडणी देण्यात येत असली, तरी जोडणीसाठी दहा हजार रुपये डिपॉझिट ठेवण्याची अट आहे. गणेशोत्सव मंडळाने दहा दिवस जेवढी वीज वापरली असेल, तेवढे बिल वजा करून उर्वरित रक्कम मंडळांना परत केली जाते. या अटीमुळेच बहुतांश मंडळे अधिकृत वीजजोडणी घेण्याकडे पाठ फिरवत असल्याची माहिती आहे.

या मंडळांनी घेतली वीजजोडणी

युवापिढी गणेशोत्सव मंडळ, पंचायत समितीसमोर

काळा मारुती गणेशोत्सव मंडळ, डाबकी रोड

वीर हनुमान गणेशोत्सव मंडळ, अगरवेस

जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, टिळक रोड

मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ, दगडी पूल

उत्सव गणेशोत्सव मंडळ, टिळक रोड

श्री गणेशोत्सव मंडळ, नेहरू पार्क

श्री बालक गणेशोत्सव मंडळ, सिंधी कॅम्प

क्रांती युवा मंडळ

विप्र युवा वाहिनी

श्रीराम गणेशोत्सव मंडळ

क्रांती युवक गणेश मंडळ

याशिवाय चार मंडळांनी प्रसाद फाटकर, प्रशांत ढोणे, श्रीकांत नेहरे, चेतन ठक्कर यांच्या नावे वीज जोडणी घेतली आहे.

Web Title: There are 310 Ganesh Mandals in the city, only 16 official electricity connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.