अकोला विभागात ५६ बसेस झाल्या भंगार!
By admin | Published: July 13, 2016 01:30 AM2016-07-13T01:30:32+5:302016-07-13T01:30:32+5:30
ताफ्यातील २५७ गाड्यांना नवीन टायरची प्रतीक्षा; ग्रामीण विभागात धावताहेत वयोर्मयादा झालेल्या गाड्या.
अकोला: एसटी महामंडळाच्या अकोला विभागात ५६ बसेस पूर्णत: भंगार झाल्या आहेत. वारंवार ब्रेक डाऊन, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स अशा विविध कारणांमुळे विभागातील ताफ्यातून त्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली.
रस्त्यावर धावणार्या एसटीचे आठ वर्षांंनंतर सर्वच आवश्यक पार्ट्स बदलले जातात; मात्र क्षमतेपक्षा अधिक वापर व नादुरुस्तीचे प्रमाण अधिक अशा विसंगतीमुळे राज्य परिवह महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांना भंगार अवस्था प्राप्त होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. नवी गाड्यांअभावी स्थानिक स्तरावरच वयोर्मयादा ओलांडलेल्या गाड्यांची पुन्हा दुरुस्ती व रंगरंगोटी केली जाते. सध्याच्या घटकेला अकोला विभागात एकूण ४0६ गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. ह्यजोपर्यंंत एसटी बसमध्ये २२ प्रकारचे अत्यावश्यक पार्ट्स असणार नाहीत, तोपर्यंंत त्या चालणार नाही.ह्ण या मागणीसाठी विभागातील संघटनांशी निगडित यांत्रिक कर्मचार्यांनी वेळोवेळी आंदोलने केली; मात्र तरीसुद्धा परिस्थितीमध्ये बदल झाला नसून, विभागात कालर्मयादा ओलांडलेल्या निम्म्याहून अधिक गाड्या ग्रामीण भागात धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागामार्फत दर महिन्याला २00 टायर्सची मागणी केली जाते; मात्र केंद्रीय कार्यालयाकडून टायरचा पुरवठाच होत नसल्याने, आजच्या घटकेला २५७ बसेस कालर्मयादा संपलेले व झिजलेले टायर्स घेऊन धावत आहेत. वारंवार 'ब्रेक डाऊनह्ण, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स, अशा अवस्थेमुळेच विभागातील ५६ बसेस भंगार झाल्या असल्याचे स्पष्ट होत आहे.
विभागीय कर्मशाळेत यांत्रिकीच्या २९0 जागा मंजूर आहेत. त्यांपैकी १४0 यांत्रिकी कार्यरत असून १५0 जागा रिक्त आहेत. मागील तीन वर्षांंपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत. अपुर्या मनुष्यबळामुळे वारंवार नादुरुस्तीसाठी येणार्या गाड्या जागेवरच उभ्या राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
एसटीच्या विभागीय कर्मशाळेमध्ये गाड्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येते. दर महिन्याला येथील कर्मशाळेत १२ एसटी बसेस ह्यआरसीह्ण करण्यात येते. २0 गाड्या आरटीओकडे तपासणीसाठी जातात. इंजिन, अँक्सल, आसन दुरुस्ती करणे यांसह पेंटिंगची कामे होतात. नवीन उपलब्ध नसल्याने रिमोल्ड केलेले टायर लावले जातात. अकोला विभागातील २७१ बस गाड्यांचे आरटीओ पासिंग आणि ११२ गाड्यांचे ह्यआरसीह्ण अद्याप झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.