व्याळा परिसरात उडीद, मूग पिकाला शेेंगाच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:06+5:302021-08-28T04:23:06+5:30
दोन वर्षापासून मूग, उडीद याचे पीक झाले नाही. यावर्षी मूग, उडदाचे पीक होईल अशी आशा होती. परंतु यंदा मूग, ...
दोन वर्षापासून मूग, उडीद याचे पीक झाले नाही. यावर्षी मूग, उडदाचे पीक होईल अशी आशा होती. परंतु यंदा मूग, उडीद पिकाला शेंगाच धरल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मूग, उडीद पिकासाठी केलेला खर्च आता वाया जाणार आहे. तसेच कपाशी पिकाची वाढही खुंटली आहे. अनेकांच्या शेतात कपाशीवर लाल्यासदृश रोग आला आहे. कपाशी सध्या काहींची अर्धा फूट तर काहींची दोन फूट इतकीच वाढ झाली असून तीही अनेक रोगांना बळी पडली आहे. सोयाबीनची वाढ झाली नसल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होणार असून यावर्षी पिकांवर आलेल्या या संकटाबाबत कृषितज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे तसेच विमा कंपनीने व शासनाने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी गजानन तायडे, यशवंत देशमुख, सुनील अडचुले, पुरुषोत्तम दळवी, किशोर देशमुख, राजेश वानखडे, नंदकिशोर वाकोडे, संदीप म्हैसने, अनिल बोचरे, गणेश बोचरे, प्रदीप गिर्हे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो: