बालकांवरील अत्याचाराचा आलेख चढता
By admin | Published: December 8, 2014 01:12 AM2014-12-08T01:12:24+5:302014-12-08T01:12:24+5:30
अमरावती परिक्षेत्रात सर्वांंत जास्त गुन्हे.
अजय डांगे / अकोला
शालेय विद्यार्थ्यांवरील अत्याचाराबाबत राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पृष्ठभूमीवर, बालकांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण अधोरेखि त करणारी आकडेवारी समोर आली आहे. २0१२ च्या तुलनेत २0१३ साली बालकांवरील अ त्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झाली असून, शासनासाठी ही चिंतेची बाब आहे.
बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिंवस वाढत आहे. या गुन्ह्यांचे स्वतंत्र वर्गीकरण शासनदप्तरी केले जात नाही. ज्या गुन्ह्यात बालकं पीडित असतात, असे सर्व गुन्हे हे ह्यबाल अ त्याचाराह्णत मोडले जातात. सन २0१२ मध्ये बालकांच्या खुनाचे १९७ गुन्हे दाखल करण्यात आले. बालिकांवरील बलात्काराचे प्रमाण गत दोन वर्षांंत वाढल्याचे दिसून येते. सन २0१२ मध्ये या गुन्ह्यांची नोंद ९१७ एवढी होती. याच गुन्ह्याची नोंद २0१३ मध्ये १ हजार ४६ एवढी करण्यात आली.सन २0१२ मध्ये १0 वर्षांंच्या आत असलेल्या पीडित बालिकांची संख्या १२७ होती. हीच संख्या २0१३ मध्ये २४२ वर पोहोचली. राज्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २0१२ आणि २0१३ या दोन्ही वर्षांंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्यांमध्ये २0१३ मध्ये ९0.१५ टक्क्यांनी वाढ झाली. मुलींचा अनधिकृत ताबा मिळण्यावण्याच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. सन २0१२ मध्ये ३१, तर सन २0१३ मध्ये ४१ गुन्हे यासंदर्भात दाखल करण्यात आले. महाराष्ट्रात २0१३ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यांमध्ये १00 टक्के वाढ झाली आहे.
*अमरावती परिक्षेत्रात सर्वांत जास्त गुन्हे
परिक्षेत्रनिहाय विचार केल्यास २0१३ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे सर्वांत जास्त गुन्हे अमराव ती परिक्षेत्रात नोंदविण्यात आले.
परिक्षेत्र गुन्हे
अमरावती ७३८
औरंगाबाद ३१५
नांदेड २५८
कोल्हापूर ८0८
नागपूर ६९४
नाशिक ४८८
ठाणे ३९१