कर्जमाफीच्या निकषांचा स्पष्ट आदेशच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:47 AM2017-07-27T02:47:44+5:302017-07-27T02:47:48+5:30
अकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.
विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे शासनाकडून देण्यात येणाºया तातडीच्या दहा हजार रुपये अनुदानाचा लाभ अकोट तालुक्यात केवळ चार शेतकºयांना देण्यात आला आहे.
शेतकºयांना कर्जमाफी देण्यावरून सरसकट, तत्त्वत: आदी विविध प्रकारच्या घोषणा शासनाने केल्यात; परंतु स्पष्ट असा आदेश बँकांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे नेमक्या कर्जमाफीकरिता कोणते-कोणते शेतकरी पात्र ठरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोट तालुक्यात ५९ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून अंदाजे साडेसात हजार शेतकºयांना ५४ कोटी ६२ लाख ४३ हजारांचे नवीन कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१४-१५ पासून असलेल्या कमीत कमी सात हजार शेतकºयांना पुनर्गठन करून देण्यात आले आहे. कर्जमाफीच्या आदेशाचा पूर्णत: निर्णय लागत नसताना शासनाने शेतकºयांना दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्याची घोषणा केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील केवळ चारच शेतकºयांनी प्रत्येकी दहा हजारांचे अनुदान घेतले आहे.
बँकांमार्फत अजूनही दहा हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत आहेत; परंतु दहा हजार रुपयांचे अनुदान घेतल्यास कर्जमाफी मिळणार की नाही, हे अद्याप शासनाने स्पष्ट न केल्याने शेतकरीसुद्धा या दहा हजारांच्या अनुदानाकडे पाठ फिरवित आहेत. यापूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकरी थकबाकीदार राहिले होते.
या शेतकºयांनी आपल्या कर्जाचा भरणा केला नाही; परंतु निकष व कर्जमाफीची पात्रता ठरविण्याबाबतचा शासनाचा स्पष्ट आदेश बँकांपर्यंत न पोहोचल्याने बँकांनीसुद्धा याद्या लावल्या नाहीत. कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापर्यंत दिली जाणार व कोणते शेतकरी याचे लाभार्थी ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकºयांच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अनेक शेतकºयांनी कर्जाचे केले पुनर्गठन
अकोट तालुक्यातील ५९ सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सन २०१५-१६ च्या हंगामात १५ हजार ८७७ शेतकºयांना ८४ कोटी ८९ लाख ८ हजार पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ९५८ शेतकºयांनी ५५ कोटी ५५ लाख ५७ हजार एवढा भरणा केला. दरम्यान, ११ हजार ९५ शेतकरी सभासदांनी अद्यापही ३ कोटी २७ लाख ८ हजार थकीत रक्कम भरली नाही, तर ५२ शेतकरी सभासदांनी २०१६-१७ मध्ये ८ लाख २४ हजार एवढी रक्कम भरली आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या आदेशानंतरच पीक कर्जमाफीचा आकडा समोर येण्याची शक्यता आहे.
कर्जमाफीचा निकष व पात्रता ठरविण्याबाबत अद्याप कोणताच स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, हे सांगता येत नाही.
- एस.डी. वालसिंगे,
वरिष्ठ निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोट.