बंदी आदेशाचे पालनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:31+5:302021-04-30T04:23:31+5:30
.............................. रस्त्यावरच फळांची दुकाने अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकादरम्यान फळांची हातगाड्यांवर विक्री हाेत हाेती. सकाळी ...
..............................
रस्त्यावरच फळांची दुकाने
अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकादरम्यान फळांची हातगाड्यांवर विक्री हाेत हाेती. सकाळी ११नंतरही अत्यावश्यक सेवेंतर्गत येत असलेली किराणा, दूध, बेकरी ही दुकाने बंद झाल्यानंतरही फळविक्री सुरूच हाेती.
..............................
विद्यापीठस्तरीय पुरस्कार घाेषित
अकाेला : स्वच्छ भारत - स्वस्थ भारत अभियानांतर्गत निवड झालेल्या विद्यापीठस्तरीय जिल्हानिहाय पुरस्कारासाठी अकोला जिल्ह्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला व श्री. रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालय, अकोला या महाविद्यालयांची निवड झाली आहे.
..............................
भाजपतर्फे मास्क वाटप
अकोला : भाजपतर्फे दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात शहराच्या मंडळातील विविध भागात मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे, नगरसेवक धनंजय धबाले, मंडळ सरचिटणीस गोपाल मुळे, प्रफुल कानकिरड, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष रितेश जामनारे उपस्थित हाेते.
......................................
सैनिक कॅन्टीनचे काऊंटर वाढवा
अकोला : भारतीय सैन्यात कार्यरत व निवृत्त झालेल्या सैनिकांकरिता अकोल्यात सुरू असलेल्या सैनिक कॅन्टीनचे काऊंटर वाढविण्याची मागणी ग्रामीण युवा संघटना जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे यांनी केली आहे.
................................................
शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करा!
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील त्रुटींची दुरुस्ती करून याद्या अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सातही तहसील कार्यालयांच्या संबंधित नायब तहसीलदारांना दिले आहेत.
............
सातवा वेतन आयोग; शिक्षक वंचित!
अकोला : राज्य शासनाने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, कालबद्ध पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनांपासून अनेक कर्मचारी वंचित असल्याचा आरोप महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने लक्ष देऊन शिक्षकांना लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
---------------------------
जमावबंदीत रस्त्यांवर गर्दी कायमच!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री कडक निर्बंध लागू करण्यात आले; मात्र शहरातील बाजार परिसर तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर नागरिकांची होणारी गर्दी कायमच असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
............................
पेट्राेल-डिझेलची अवैध विक्री
अकाेला : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची अवैध विक्री वाढली आहे. गत आठवड्यात बाळापूर तालुक्यातील हातरुण येथून पेट्रोल, डिझेल जप्त केल्याची कारवाई केली होती. उन्हाळ्याच्या दिवसात कॅनमध्ये पेट्रोल वाहून नेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या अवैध विक्रीवर कारवाईची मागणी होत आहे.
------------------------------------------------------