CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 17:58 IST2020-03-27T17:54:13+5:302020-03-27T17:58:02+5:30
अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली, तरी खबरदारी राखणे अत्यावशक आहे.

CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नाही. शुक्रवारी आणखी एकाचा वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून, एकही नवीन संशयित दाखल झाला नाही. अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली, तरी खबरदारी राखणे अत्यावशक आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी २२ रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी चार संशयित रुग्ण दाखल झाल्याने चिंतेचे वातावरण होते; पण शुक्रवारी एकही नवीन संशयित रुग्ण दाखल झाला नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या आयसोलेशन कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल असून, गुरुवारी सकाळीच त्यांचे वैद्यकीय चाचणीचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले.