अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:00 AM2021-04-11T11:00:50+5:302021-04-11T11:01:01+5:30

No space left in the cemetery : ओटे व पिंजरे कमी पडत असल्याने, शहरातील इतर स्मशानभूमीत मृतदेह नेण्याची वेळ येत आहे.

There is no space left in the cemetery for the funeral! | अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही!

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही!

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने, शहरातील मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा कमी पडू लागली आहे. शनिवारी शहरात दोन दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या १६ तर मोहता मिल स्मशानभूमीत ९ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओटे व पिंजरे कमी पडत असल्याने, शहरातील इतर स्मशानभूमीत मृतदेह नेण्याची वेळ येत आहे. मृतकांमध्ये अकोल्यासोबत बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील रुग्ण असल्याने अकोल्यात मृतकांची संख्या वाढली आहे.

शहरासह जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. दरराेज २००-३०० पेक्षा जास्त काेराेनाबाधित आढळत आहेत. संसर्गाचा वाढता आलेख धडकी भरवणारा ठरत असताना मृत्यूचा आकडाही वाढत आहे. यात वृद्धांसाेबतच चाळीशीतील रुग्णांनाही मृत्यूने कवटाळले आहे.

 

दररोज ४-५ रुग्णांचे मृत्यू हाेत आहेत. अकोला शहरात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने, मृतांवर अकोला शहरातच अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी काेराेनाबाधितांवर मोहता मिल, मोठी उमरी, सिंधी कॅम्पमधील स्मशानभूमी, गुलजार पुरा स्मशानभूमी अंत्यसंस्कार होत आहे, परंतु गेल्या दोन दिवसांत मोहता मिल येथील परिस्थिती गंभीर झाली असून, जागा कमी पडत आहे. त्यामुळे दु:खद प्रसंगात मृतांच्या नातेवाइकांसमोर वाईट प्रसंग उद्भवतो.

 

मुस्लिम युवकांचा पुढाकार

मोहता मिल स्मशानभूमीत दोनच कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी एकच कर्मचारी असल्याने नियाेजन विस्कळीत हाेत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जावेद जकारीया व तन्वीर खान, जावेद खान, वसीम खान, समीर खान, नदीम खान या टीमने पुढाकार घेतला आहे.

 

मोहता मिल स्मशानभूमीत १० ओटे आहेत. शनिवारी यातील ९ ओट्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. केवळ एक जागा आता शिल्लक आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत आहे. आणखी मृतदेह आल्यास जागा कमी पडणार आहे.

दीपक शिंदे, कर्मचारी, मोहता मिल

 

दोन दिवसांत १६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

गेल्या दाेन दिवसांत मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वाढले आहेत. शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसांत १६ कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मोहता मिल येथील कर्मचाऱ्याने दिली.

 

आतापर्यंतचे मृत्यू ४९९

आजचे मृत्यू ७

आजचे रुग्ण ३००

आतापर्यंतचे रुग्ण ३०,४२८

शहरातील एकूण स्मशानभूमी १४

शहरातील एकूण कब्रस्थान ३

शहरातील एकूण दफनभूमी १

Web Title: There is no space left in the cemetery for the funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.