एक दिवस पुरेल एवढाही लसीचा पुरवठा नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:07+5:302021-04-09T04:19:07+5:30

अनेकांना मिळेना दुसरा डोस जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन प्रकराच्या लसींचा उपयोग होत आहे. त्यामुळे ...

There is not enough supply of vaccine for one day! | एक दिवस पुरेल एवढाही लसीचा पुरवठा नाही !

एक दिवस पुरेल एवढाही लसीचा पुरवठा नाही !

Next

अनेकांना मिळेना दुसरा डोस

जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन प्रकराच्या लसींचा उपयोग होत आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस कोविशिल्डचा घेतला, अशांना दुसरा डोसही कोविशिल्डचाच घेणे अनिवार्य आहे. लसीचा पर्याप्त साठा नसल्याने अनेकांना दुसऱ्या डोससाठी आणखी प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जात असल्याची माहिती आहे.

लसीकरण केंद्र बंद होण्याची शक्यता

जिल्ह्यात आतापर्यंत कोविड लसीकरण केेंद्र सुरळीत सुरू आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच कोविड लसीचा साठा शिल्लक आहे, तर नव्याने पुरविण्यात आलेला लसीचा साठा एक दिवस पुरेल एवढाही शिल्लक नाही. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे अकोल्यातीलही कोविड लसीकरण केंद्र दोन दिवसांनंतर बंद होण्याची शक्यता आहे.

विभागातील चार जिल्ह्यांसाठी १६ हजार १६० डोस प्राप्त झाले आहेत. ही लस कोव्हॅक्सिनची असून, गुरुवारी पहाटे लसीचा साठा अकोल्यात आला. जिल्हानिहाय वितरण सुरू आहे.

- राजेंद्र इंगळे, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी, विभागीय लस भंडार, अकोला.

Web Title: There is not enough supply of vaccine for one day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.