मतदार यादीमध्ये फोटो नसल्याने तालुक्यातील १२ हजार ७९७ नावे वगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:26+5:302021-09-23T04:21:26+5:30
मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या निवासी पत्त्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी भेटी दिल्या असता मतदार पत्त्यावर आढळून आले नाहीत. ...
मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या निवासी पत्त्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी भेटी दिल्या असता मतदार पत्त्यावर आढळून आले नाहीत. जे मतदार निवासी पत्त्यावर राहत नाहीत, त्या मतदारांना उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी २४ जून रोजी नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर ५ जुलैपर्यंत फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत किंवा तहसील कार्यालय मूर्तिजापूर, बार्शीटाकळी निवडणूक विभागात जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या. मतदारसंघातील १५ हजार ९९७ मतदारांपैकी १२ हजार ७९७ मतदारांचे फोटो प्राप्त न झाल्याने त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.
---------------------
मतदार यादी शंभर टक्के छायाचित्र युक्त
फोटो नसलेल्या त्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने ३२ मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी शंभर टक्के छायाचित्र युक्त झाली आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अभयसिंह मोहिते, सहा. मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप पवार, गजानन हामंद, नायब तहसीलदार निवडणूक विभाग, मोहन पांडे, श्रीहरी ठोंबे तसेच सर्व ३८१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सर्व पर्यवेक्षक, तहसील कार्यालय निवडणूक विभागाचे सचिन सरदार, बार्शीटाकळीचे अनिल चाहाकार यांनी परिश्रम घेतले.