पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:35 PM2019-10-20T14:35:56+5:302019-10-20T14:36:11+5:30

जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.

There was no rain; But the water increased by one percent! | पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली असताना अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. आता शुक्रवारपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात काटेपूर्णा धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. आजमितीस ५४.३७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. त्यामुळे अकोलेकरांवरील पाणी संकट टळले आहे. जिल्ह्यातील इतरही धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वान धरणाचा जलसाठा आजमितीस ८१.१५ दलघमी, १०० टक्के आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २८.८५ दलघमी, १०० टक्के, याच तालुक्यातील मोर्णा धरणात ३०.८७ दलघमी, ७४.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ७.५६ दलघमी, ६४.६३ टक्के तर घुंगशी बॅरेजमध्ये १५.३२ दलघमी ८८.७१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरण वगळता इतर सर्वच धरणांतून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: There was no rain; But the water increased by one percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.