गुल्लरघाट तलावावर ४५२ पाणपक्षी आढळले

By admin | Published: January 22, 2015 01:52 AM2015-01-22T01:52:38+5:302015-01-22T01:52:38+5:30

धारगड परिक्षेत्रातील गुल्लरघाट तलावावर पक्ष्यांच्या ४0 प्रजातीमधील ४५२ पाणपक्षी आढळून आले आहेत.

There were 452 water birds found in Gullarghat lake | गुल्लरघाट तलावावर ४५२ पाणपक्षी आढळले

गुल्लरघाट तलावावर ४५२ पाणपक्षी आढळले

Next

आकोट (जि. अकोला): आकोट वन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रातील गुल्लरघाट तलावावर करण्यात आलेल्या पक्षी प्रगणनामध्ये ४५२ पाणपक्षी आढळले असल्याची माहिती उपवनसंरक्षक वर्मा यांनी दिली. अकोला येथील पक्षी निरीक्षक तज्ज्ञ दीपक जोशी, डॉ. चौखंडे, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती अंतर्गत ऋतुजा कुकडे व शिरीष शेडोंकार यांनी पाणस्थळावरील स्थानिक व स्थलांतरित पाणपक्ष्यांची प्रगणना केली. पक्ष्यांच्या ४0 विविध प्रजातीमध्ये ४५२ पाणपक्षी आढळून आले आहेत.

Web Title: There were 452 water birds found in Gullarghat lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.