गावठाण, नगर क्षेत्रातील सातबारा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:33 PM2018-09-03T15:33:17+5:302018-09-03T15:35:18+5:30

अकोला : गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सातबारा देणे बंद करण्यात आले आहे.

There will be no saat bara to the city area | गावठाण, नगर क्षेत्रातील सातबारा बंद

गावठाण, नगर क्षेत्रातील सातबारा बंद

googlenewsNext
ठळक मुद्देमिळकत पत्रिका किंवा सातबारा या दुहेरी नोंदीमुळे मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. ते रोखण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ३० आॅगस्ट रोजी आदेश दिला. त्यानुसार सातबारा रद्द करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत केली जाणार आहे.

- सदानंद सिरसाट
अकोला : गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सातबारा देणे बंद करण्यात आले आहे. भूखंड, जमिनीच्या व्यवहारात ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मिळकत पत्रिका किंवा सातबारा या दुहेरी नोंदीमुळे मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. ते रोखण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ३० आॅगस्ट रोजी आदेश दिला. त्यानुसार सातबारा रद्द करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत केली जाणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार शेत जमिनीसाठी सातबारा, तर नगर भूमापन किंवा गावठाण क्षेत्रासाठी मिळकत पत्रिका हा अधिकार अभिलेख आहे. तरीही नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील जमीन मालकांची नावे मिळकत पत्रिका व सातबारा घेण्याची प्रथा सुरूच आहे. त्यामुळे जमिनीच्या हक्कामध्ये गुंतागुंत होऊन फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले. विशेष म्हणजे, हे प्रकार एकच भूखंड किंवा जमिनीची दुहेरी नोंद होत असल्याने घडल्याचे निदर्शनास आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गावठाण, नगर भूमापन कोणत्याही भूखंड, जमिनीची एकच नोंद पद्धत ठेवण्याचा आदेश जमाबंदी आयुक्तांना द्यावा लागला. यापूर्वीही ही दुहेरी नोंद पद्धत बंद करण्यासाठी डिसेंबर १९९० पासून जुलै २०११ पर्यंत सातत्याने आदेश देण्यात आले. तरीही राज्यातील नगर भूमापन असणाºया क्षेत्रातील सातबारा अद्यापही बंद झालेला नाही, हा प्रकार तातडीने बंद करून मिळकत पत्रिका नोंदीची प्रक्रिया सुरू करा, असेही जमाबंदी आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
- असा होईल सातबारा बंद..
- नागरी, गावठाण क्षेत्रासाठी नगर भूमापन योजना लागू झाली व मिळकत पत्रिका तयार झाली, त्याठिकाणी बिनशेती झालेली सर्व सातबारा करणे.
- जेथे नगर रचना योजना लागू असल्यास त्या क्षेत्रातील सातबारा व जुन्या मिळकत पत्रिका बंद करून नगर रचना योजनेत तयार झालेले बी फॉर्म नुसार अंतिम भूखंड क्रमांकानुसार मिळकत पत्रिकेवरील नोंदी कायम करणे अथवा नवीन मिळकत पत्रिका उघडणे.
- तहसीलदार प्रत्येक गावासाठी आदेश काढून ई-फेरफार आज्ञावलीतून फेरफार घेऊन सात-बारा बंद करण्याचे निर्देश देतील.
- मिळकत पत्रिका व सातबारावरील क्षेत्राच्या नोंदीमध्ये तफावत असल्यास प्रत्यक्ष मोजणी करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत केली जाणार आहे.

 

Web Title: There will be no saat bara to the city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.