गायगावच्या आॅइल डेपोत पडणार तीन टाक्यांची भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:03 PM2018-09-08T14:03:35+5:302018-09-08T14:04:42+5:30
अकोला : स्थानिक गायगाव येथील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन डेपोमध्ये पेट्रोल-डीझल साठविण्यासाठी अतिरिक्त तीन टाक्यांची भर पडणार आहे. या कार्यप्रणालीला कुणाचा आक्षेप तर नाही ना, यासाठी ग्रामसभा घेण्यात आली.
अकोला : स्थानिक गायगाव येथील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन डेपोमध्ये पेट्रोल-डीझल साठविण्यासाठी अतिरिक्त तीन टाक्यांची भर पडणार आहे. या कार्यप्रणालीला कुणाचा आक्षेप तर नाही ना, यासाठी ग्रामसभा घेण्यात आली.
पेट्रोल - डीझलच्या साठवणुकीच्या टाक्याची क्षमता संपुष्टात येत असल्याने इंडियन आॅइल डेपोने नव्या क्षमतेच्या तीन टाक्यांची उभारणी सुरू केली आहे. या टाक्यांचा उपयोग सुरू करण्याआधी ग्रामसभेची परवानगी आवश्यक असल्याने, ना हरकत आवश्यक असल्याने शुक्रवारी येथे जनसुनावणी कार्यक्रम घेतला गेला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयातर्फे हा कार्यक्रम गायगावच्या डेपोत घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागीय अधिकारी संदीप पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम गायगावच्या टीटी पार्किंग परिसरात पार पडला. जवळपास दोनशे ग्रामस्थ येथे उपस्थित होते, असा दावा आॅइल कंपनीच्यावतीने करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी येथे अनेक समस्या मांडून काही सुविधा मिळण्याची मागणी येथे केली. यथोचित मागण्यांबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन इंडियन आॅइलतर्फे ग्रामस्थांना देण्यात आले.