विदर्भात दोन दिवस धुकं राहणार; हवामानशास्त्राचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:34 PM2019-12-15T18:34:00+5:302019-12-15T18:34:07+5:30
येत्या दोन दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून,धुकंही पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञानी वर्तविला आहे.
अकोला : गत चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून,धुकंही पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञानी वर्तविला आहे.
सद्याच्य वेस्टर्न डिस्टर्बन्स च्या प्रभावामुळे हिमालयीन क्षेत्रात बर्फवृष्टी होत असून, पुढील काही दिवस जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड बराचसा उत्तर भारत गारठणार आहे् या भागातून येणारे थंड वारे दक्षिणेकडे वाहत असून, उत्तर प्रदेश ते विदर्भ ९०० मिटर उंचीवर कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे तसेच केरळ किनारपट्टीवर सुद्धा कमी दाबाची द्रोणिय स्थिती पाहता बंगालच्या उपसागरावरुन कोमट आणि बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे विदर्भाच्या उत्तर भागावर थंड आणि बाष्पयुक्त वाऱ्याची टक्कर होत असल्याने सध्या पाऊस पडत आहे. ही परिस्थिती आनखी एक ते दोन दिवस टीकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण जवळपास क्लियर होऊन हळूहळू थंडीचे प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच पुढील दोन तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी धुकं पडण्याची शक्यताही हवामान अभ्यासक अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
गत चोविस तासात रविवार,१५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.दुपारपर्यंत ढगाळ वातावरण व वातावरणात गारवा होता.तर काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. अकोला येथील हे किमान तापमान १७.३ अंशावर पोहोचले होते. बुलडाणा १७.०,वाशिम १५.८, अमरावती १८.४, यवतमाळ १७.४, वर्धा १८.४ नागपूर १६.८,चंद्रपूर १८.२,गोंदिया १७.५, तर ब्रम्हपुरीचे किमान तापमान १७.४ अंश होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.