ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 10:32 AM2021-08-17T10:32:54+5:302021-08-17T10:33:16+5:30

Crime News : हातात व खिशात न बसणारे माेबाइल चाेरट्यांना चाेरी करण्यासाठी साेयीचे ठरत असल्याचे वास्तव आहे.

They do not fit in the hand, nor do they fit in the pocket | ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात

ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात

googlenewsNext

- सचिन राऊत

अकाेला : दिवसेंदिवस अनाेेखे व महागडे माेबाइल वापरण्याची फॅशन आली असून या नवीन फॅशननुसार महागडे आणि माेठे माेबाइल वापरणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ मात्र हेच महागडे आणि हातात व खिशात न बसणारे माेबाइल चाेरट्यांना चाेरी करण्यासाठी साेयीचे ठरत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ना हातात बसतात ना खिशात मावतात असेच माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात हे म्हणण्याची वेळ आली आहे. अकाेला शहरात विविध गर्दीच्या ठिकाणांसह राजराजेश्वर पालखी कावड महाेत्सव, गणेशाेत्सव मिरवणूक, रामनवमी शाेभायात्रा, माेहरम जुलूस, ईद, दिवाळी खरेदी, १४ एप्रिल धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूक, पाेळा, दसरा, हनुमान जयंती, गरबा महाेत्सव यासह विविध सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठेत माेठ्या प्रमाणात गर्दी हाेते. त्यामुळे माेबाइल चाेरट्यांचीही चांगलीच चांदी हाेत असून या काळात शेकडाे माेबाइल चाेरीला जात असल्याचे वास्तव आहे. मात्र आता माेबाइल गहाळ झाला या ऐवजी माेबाइल चाेरीचे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने तसेच अनेक माेबाइल चाेरट्यांच्या मुसक्या आवळल्यामुळे माेबाइल चाेरीच्या घटनांना आळा बसल्याची माहिती आहे. ५० ते ६० टक्के माेबाइल चाेरी कमी झाली असून माेबाइल विसरणे व गहाळ हाेण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती आहे.

शहरातील माेबाइल चाेरीच्या घटना

२०१९ ३७८

२०२० १६७

२०२१ १५४

 

चाेरी नव्हे गहाळ म्हणा

अनेक वेळा माेबाइल चाेरी न हाेता ताे गहाळ हाेत असल्याचेही किस्से समाेर आले आहेत. माेबाइल चाेरी झाला तर पाेलीस चाेरीचा गुन्हा दाखल करतात; मात्र अनेक वेळा दुकानात खरेदी करताना किंवा बाहेर जाताना माेबाइल त्याच ठिकाणी विसरत असल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे माेबाइल चाेरी नव्हे तर गहाळ झाला असे म्हणा. पाेलीसही अशाच प्रकारे नाेंद करतात; मात्र आता बहुतांश प्रकरणात माेबाइल चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने तसेच या चाेरट्यांचा सायबर पाेलिसांकडून शाेध घेण्यात येत असल्याने या माेबाइल चाेरीवर अंकुश लागल्याचे वास्तव आहे.

या भागामध्ये माेबाइल सांभाळा

शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजेच टिळक राेड, गांधी राेड, गांधी चाैक, किराणा बाजार, कपडा बाजार, जनता भाजी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, जुने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, सराफा बाजार यासह अकाेट फैल, खदान या ठिकाणी माेबाइल सांभाळून वापरा. अन्यथा तुमचा माेबाइल चाेरी हाेण्याची दाट शक्यता आहे. यासह आकाेट शहरातील साेनू चाैक, मूर्तिजापूरमधील शुक्रवार व मंगळवार बाजार, तेल्हारा शहरातील मुख्य बाजारपेठ, पातूर शहर, बार्शीटाकळी शहर, बाळापूर शहरातील काही भागातही माेबाइल सांभाळून वापरावा, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Web Title: They do not fit in the hand, nor do they fit in the pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.