चिमणी वाचवण्यासाठी ते करतात भगीरथ प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 05:29 PM2022-03-19T17:29:30+5:302022-03-19T17:31:24+5:30

World Sparrow day special : पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्यासाठी धडपड करुन त्यांच्यासाठी घरातच अनेक घरटी लावली आहे.

They try hard to save the sparrow | चिमणी वाचवण्यासाठी ते करतात भगीरथ प्रयत्न 

चिमणी वाचवण्यासाठी ते करतात भगीरथ प्रयत्न 

Next

- संजय उमक 
मूर्तिजापूर : आजमितीला चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु मूर्तिजापूर शहराला लागून असलेल्या सिरसो (पुंडलिक नगर ) येथील पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्यासाठी धडपड करुन त्यांच्यासाठी घरातच अनेक घरटी लावली आहे. सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात. 
         ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी ते अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. चिमण्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध घरटी उभारली आहेत, या घरट्यां शिवाय त्यांच्या चाऱ्या पाण्याचीही बारमाही व्यवस्था ते करतात, आता त्यांच्या घरात चिमण्यां आणि विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत, अनेक अनोळखी पक्षी वा व्यास्तव्यास असल्याचे गुजर सांगतात. काळाच्या ओघात व सिमेंटच्या जंगलात चिऊताई चिवचिवाट कमी झाला आहे, चिऊताईचा संदर्भ लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत असला तरी चिमणी वाचविण्यासाठी त्या ताकदीचे प्रयत्न सध्या तरी होत नसल्याचे चित्र आहे. परंतू पुंडलिक नगर येथे राहत असलेले पंकज गुजर हे त्यासाठी अपवाद ठरले आहे. शहरी भागात चिमण्यांना घरटे करण्यासाठी जागच उरली नाही परंतु ग्रामीण भागात त्यांचा चिवचिवाट मोठ्या प्रमाणात आढळून येते गुजर यांच्या भगीरथ प्रयत्न आणि भूतदया ही निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.
 
लहानपणापासूनच पशू पक्षाचा लळा असल्याने आपण पक्षी संरक्षणासाठी काही तरी केले पाहिजे ही कल्पना मनात आली, त्या दृष्टीने घराच्या खुल्या जागेत मोठे शेड उभारुन हिरव्या वेली व झाडांनी नटवले, पक्षांसाठी अनेक घरटी तयार केली. आता या घरट्यांत शेकडो शेकडो चिमण्या, खारूताई, इतर पक्षांचा निवास असतो, अनेक अनोळखी व दुर्मिळ पक्षीही या घरट्यांत वास करतात.
-पंकज गुजर, चिमणी संरक्षक, सिरसो (मूर्तिजापूर)

Web Title: They try hard to save the sparrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.