चोरट्यास कारावास

By admin | Published: March 25, 2017 01:38 AM2017-03-25T01:38:01+5:302017-03-25T01:38:01+5:30

बांधकाम साहित्य चोरी केल्याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी न्यायालयाने कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली.

Thievery imprisonment | चोरट्यास कारावास

चोरट्यास कारावास

Next

अकोला, दि. २४- बांधकाम साहित्य चोरी केल्याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी न्यायालयाने कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली. गोकूळ कॉलनीमध्ये राहणारे शिक्षक राम मखराम राठोड यांनी ७ मे २0१६ रोजी चोरीची तक्रार दिली होती. लोखंड, प्लायवूड, सिमेंट चौकट असे एकूण ४ हजार २00 रुपयांचे साहित्य चोरी गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी विद्यावान बळीराम प्रधान (वय ५0, रा. कृषी नगर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्यवे गुन्हा दाखल केला. या खटल्याची सुनावणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी हरणे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला सहा महिने सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

Web Title: Thievery imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.