जिल्हय़ात चोरट्यांचा मनसोक्त धुमाकूळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:03 AM2017-08-19T02:03:46+5:302017-08-19T02:05:01+5:30
अकोला : शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी चोरीचा सपाटाच लावला आहे. दोन दिवसांमध्ये शहरातील डाबकी रोड, अकोट फैल, खदानसह ग्रामीण भागातील वाडेगाव, सस्ती, मूर्तिजापूर, बाळापुरात तब्बल सातच्यावर चोर्या झालेल्या असून, तीन ठिकाणी लुटमार झाली आहे. जिल्हाभर चोरट्यांनी मनसोक्त धुमाकूळ घातल्याने यामधील एकाही चोरट्यास अटक करण्यात किंवा चोर्या रोखण्यात पोलिसांना यश आले नसल्याने या चोरट्यांनी पोलिसांनी खुले आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हय़ातील तब्बल १३ ठाणेदारांच्या बदल्या केल्या. यामध्ये अकोट शहरासह माना, तेल्हारा व पातूरचा समावेश आहे. यावेळी कलासागर यांनी ऑन रोड पोलिसिंग राबविण्याचा तसेच नागरिकांमध्ये जाऊन पोलिसिंग करा, त्यांच्यात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांचे जे खरे कर्तव्य आहे, त्याकडेच पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चोरट्यांनी सुरू केलेल्या चोर्यांच्या सपाट्यावरून दिसून येत आहे. अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक लाखाचे दागिने लंपास करण्यात आले, त्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठय़ा चोर्या झाल्या असून, तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल पळविला, तर खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांना लुटण्यात आले असून, तीन ठिकाणी घरफोड्या झालेल्या आहेत. यावरून नवीन ठाणेदारांना चकमा देऊन पोलीस कर्मचार्यांनी आराम सुरू केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांचा मनसोक्त धुमाकूळ सुरू असताना पोलिसांना एकही चोरटा अद्याप दिसला नाही, एवढेच काय तर संशयितही पोलिसांना मिळाले नाहीत. याउलट ठाणेदारांना अनभिज्ञ ठेवत वसुलीसाठी जुने प्रकरणं उखरण्याचा प्रताप काही पोलीस कर्मचार्यांनी सुरू केला आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचे साफ दुर्लक्ष असून, नागरिकांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे.
शहराचे अधिकारी करताहेत तरी काय?
संपूर्ण अकोला शहराची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकार्यांच्या कार्यक्षेत्रात चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. दिवसाढवळय़ा घरफोड्या करण्यात येत आहेत, तर खुलेआम लुटमारही सुरू असताना शहराची जबाबदारी असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी करताहेत तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मात्र, त्याकडे संबंधित अधिकार्यांचे सार्फ दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे.