जिल्ह्यात चोरट्यांची दहशत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:45 AM2017-09-18T01:45:04+5:302017-09-18T01:45:08+5:30
शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी मनसोक्त धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. दर दिवसाला तीन ते चार घरफोड्या, लुटमारीच्या घटना होत असताना पोलिसिंग मात्र कुठेही दिसत नसल्याचे यावरू न दिसते आहे. गत महिन्यापासून चोर्यांची मालिका सुरूच असताना पोलिसांनी केवळ बोटावर मोजण्याइतक्या चोर्यांचा तपास केला आहे. गत आठ दिवसांमध्ये चोर्या, खून, दरोडा, लुटमारीच्या जास्त घटना घडल्या आहेत.एकूणच जिल्हयात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी मनसोक्त धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. दर दिवसाला तीन ते चार घरफोड्या, लुटमारीच्या घटना होत असताना पोलिसिंग मात्र कुठेही दिसत नसल्याचे यावरू न दिसते आहे. गत महिन्यापासून चोर्यांची मालिका सुरूच असताना पोलिसांनी केवळ बोटावर मोजण्याइतक्या चोर्यांचा तपास केला आहे. गत आठ दिवसांमध्ये चोर्या, खून, दरोडा, लुटमारीच्या जास्त घटना घडल्या आहेत.एकूणच जिल्हयात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
या तीन घरातून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. स्वप्नशिल्प या अपार्टमेंटमधील रहिवासी सुरज इंगळे, गणेश लोखंडे व एकबोटे या तिघांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरात १७ दिवसांत १५ चोर्या
शहरात १७ दिवसांत १५ चोर्या झालेल्या आहेत. यामध्ये विलास ठोसर यांची एम एच ३0 ए एफ ४१४ क्रमांकाची कार पळविली. मृणाली मनोज खंडेलवाल यांच्या गळय़ातील २५ ग्रॅमची सोनसाखळी व ३0 हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला. दीपक मराठे यांच्या घरातून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अजीमशहा करीमशहा याने कपिलवस्तू नगरातून एका विद्यार्थिनीची सोनसाखळी पळविण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्यास पकडले. अब्दुल शकील अब्दुल सलाम ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
यासोबतच त्यांचे बंधू अब्दुल खलील अब्दुल सलाम, अख्तर अली बशीर अली, अब्दुल शाहीर अब्दुल माजीद यांच्याही घरात चोर्या करण्यात आल्या. संजय चौधरी व प्रमिला थोटे यांच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यानंतर रविवारी पहाटे गीतानगरातील पंकज पनपालीया, गौरक्षण रोडवर तीन घरफोड्या, अशा एकूण १५ घरफोड्या झाल्याचे उघड झाले.
शहरासह जिल्हय़ात घटना घडत आहेत. मात्र, त्याचा तपासही सुरू असून अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात येत आहेत. खदान, सिव्हिल लाइन्स व जुने शहरात झालेल्या चोर्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तरीही या घटना रोखण्यासाठी आता पोलिसिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू, काही अधिकारी-कर्मचार्यांना सूचना देऊन तपासाला गती देण्याचा प्रयत्न करू. तसेच चोर्यांचा छडा लावण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येईल.
- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला.