चोर सोडून सन्याशाला फाशी !

By admin | Published: September 12, 2014 11:10 PM2014-09-12T23:10:03+5:302014-09-12T23:10:03+5:30

मालेगाव कडकडीत बंद ; पोलिसांचा निषेध, कारवाईची मागणी.

Thieves leaving hanging to death! | चोर सोडून सन्याशाला फाशी !

चोर सोडून सन्याशाला फाशी !

Next

मालेगाव (वाशिम) : नागरिकांनी पकडून दिलेल्या चोराला सोडून उलट, नागरिकांनाच उध्दट वागणूक देणार्‍या पोलिसांच्या निषेधार्थ मालेगाववासियांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मनोज राधेशाम काबरा यांना जुने बसस्थानकानजिक फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे आनंद रमेश शर्मा यांच्या घरातून एक चोर कॅमेरा चोरताना ११ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास दिसला. आनंद शर्मा व पवन शर्मा यांनी या चोराचा पाठलाग करून त्याला पोलिस स्टेशनजवळ गाठले. त्यांनी चोराला पकडून मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोणतीही विचारपूस न करता, चोरांना घेवून आलेल्या नागरिकांनाच धमकावून शिविगाळ केली. त्यांची कोणत्याही प्रकारची फिर्याद घेतली नाही. एवढेच काय, चोरालासुध्दा सोडून दिले.
१२ सप्टेंबर रोजी सकाळी ही वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरली आणि सर्व व्यापारी असोशिएशन, सराफा असोशिएशन व ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन गाठले. नागरिकांच्या गर्दीमुळे पोलिस स्टेशनला यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी नागरिकांनी चोराला त्वरित अटक करा, सहायक पोलिस निरिक्षक शिंदे यांना निलंबित करून ठाणेदाराची बदली करण्याची मागणी केली. वातावरण चिघळल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी याप्रकरणी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले; मात्र व्यापार्‍यांनी बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदविला.

Web Title: Thieves leaving hanging to death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.