पोलिसांवर चोरटे भारी; दोन बड्या चोऱ्यांचा तपास शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:27 PM2019-05-08T12:27:02+5:302019-05-08T12:27:08+5:30
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या मोठ्या चोरीचा तपासाला गती शून्य असतानाच जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी करण्यात आली.
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या मोठ्या चोरीचा तपासाला गती शून्य असतानाच जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी करण्यात आली. या दोन चोºयानंतरही खदान पोलिसांच्या डीबी पथकाला मात्र चोरट्यांचा सुगावाही नसल्याने या पथकाची कामगिरी शून्य असल्याचे बोलल्या जात आहे.
गोरक्षण रोडवरील रहिवासी जैन यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी धुडगूस घालत लाखोंचा मुद्देमाल पळविला होता. त्यानंतर या चोरीत पोलिसांनी केवळ चौकशी केली असून, चोरट्यांचा शोध अद्याप घेतलेला नाही. त्यानंतर जुने खेतान नगरात भीमराव नामदेव पवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून घरातील चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. या चोरी प्रकरणाचाही तपास पोलिसांकडून अद्याप पाहिजे तसा सुरू झालेला नसून, केवळ टोलवाटोलवी सुरू आहे. या दोन्ही चोऱ्यांच्या ठिकाणी पोलिसांनी श्वानपथक, आयकार (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) घटनास्थळी बोलावले होते; मात्र चोरीचा तपास अद्यापही शून्य असून, खदानच्या डीबी पथकावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.