‘काळानुसार चातुर्मासातील मुहूर्तांचा विचार करावा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:42+5:302021-07-21T04:14:42+5:30

येथील खोलेश्वर मंदिराजवळील श्री भोलेश्वर मंदिरात चातुर्मासामधील शुभकार्याच्या अनुषंगाने अकोला पौरोहित्य संघाची बैठक पार पडली. देवशयनी एकादशीपासून विवाह, वास्तू ...

‘Think of the moments in Chaturmas according to time!’ | ‘काळानुसार चातुर्मासातील मुहूर्तांचा विचार करावा!’

‘काळानुसार चातुर्मासातील मुहूर्तांचा विचार करावा!’

Next

येथील खोलेश्वर मंदिराजवळील श्री भोलेश्वर मंदिरात चातुर्मासामधील शुभकार्याच्या अनुषंगाने अकोला पौरोहित्य संघाची बैठक पार पडली. देवशयनी एकादशीपासून विवाह, वास्तू इत्यादी शुभकार्य थांबतात, ही आपली पौराणिक मान्यता आहे. ऋषी-मुनींनी पौराणिक काळात चातुर्मासात शुभकर्मे न करण्यावर भर दिला होता. त्यावेळी रेल्वे, बसेस आदी वाहने नव्हती. नद्यांना पूर येत होता. त्यामुळे नदी पार करण्यासाठी पूल नव्हते. आधुनिक उपकरणे, बोट, मंगल कार्यालये, मोठी हॉटेल्स नव्हती. आता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या अनुषंगाने सर्व विचार करून अकोला महाराष्ट्रीय पंचांग, जयपूरचा सम्राट पंचांग यासारख्या आधुनिक पंचांगकर्त्यांनी चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले आहेत. महाराष्ट्र पंचांगात यंदा १८ विवाह मुहूर्त दिले आहेत. ६ मुहूर्त वास्तूतील आहेत, तसेच सम्राट पंचांगाने चातुर्मासात ४० देवांच्या प्रतिष्ठेसाठी मुहूर्त, लग्नासाठी ५ मुहूर्त, ४० नवीन वास्तू, मुंज संस्कार, साखरपुडा इत्यादी ग्रहांच्या प्रवेशासाठी मुहूर्त दिले आहेत. काळाबरोबर सर्व काही समजल्यानंतर आपण चातुर्मासातील मुहूर्तांचा विचार केला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला पं. आदिचबाळ, श्यामसुंदर अवस्थी, रोहित मिश्रा, आलोक शर्मा, पंडित रविकुमार शर्मा उपस्थित होते.

फोटो

Web Title: ‘Think of the moments in Chaturmas according to time!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.