‘जलयुक्त’चे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’

By admin | Published: June 27, 2016 02:41 AM2016-06-27T02:41:41+5:302016-06-27T02:41:41+5:30

चमू आकोल्यात दाखल; जलयुक्त शिवारच्या सर्वच कामांची पाहणी होणार.

Third Party Inspection of 'Jalukta' | ‘जलयुक्त’चे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’

‘जलयुक्त’चे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’

Next

राजेश शेगोकार / अकोला
जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ह्यथर्ड पार्टी इन्स्पेक्शनह्ण करण्याचा शासनाचा आदेश असून, त्यानुसार अकोला जिल्ह्यातील कामांची तपासणी सुरू झाली आहे.
जलयुक्त शिवार योजनेत सिमेंट नाला बंधारा, नदी-नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, साठवण बंधार्‍यांची दुरुस्ती, कालवा दुरुस्ती आदी कामे कृषी, लघू पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषदतर्फे केली जात आहेत. या कामांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी जलसंधारण विभागाने ५ डिसेंबर २0१४ व १३ मार्च २0१५ रोजी आदेश जारी केला आहे.
त्या आदेशानुसार योजनेतील कामे मार्चपूर्वी त्रयस्थ संस्थेकडून तपासून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यानुसार अमरावती विभागात मूल्यमापन सुरू झाले असून, अमरावती, वाशिमनंतर ही चमू अकोला जिल्ह्यात कामांचे मूल्यमापन करण्यासाठी दाखल झाली आहे.
नाबार्डच्या निर्देशावरून नॅपकॉनचे सहायक महाव्यवस्थापक खंडूजी काशीद यांच्या नेतृत्वात सहा सदस्य विविध कामांची पाहणी करीत आहेत. रविवारी पातूर, तालुक्यातील कामांची पाहणी पूर्ण केली असून, सोमवार नंतर इतर तालुक्यातील कामांचे मूल्यमापन ही चमू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीच वाशीम जिल्ह्यातील ४00 कामांचे मुल्यामापन पुर्ण झाले आहे.
या चमूमध्ये खंडूजी काशीद यांच्यासह राजेश खाडे, पवन रायकर, अमोल बनसोडे, विवेक बिर्‍हाडे, संतोष तंवर, संजय भवर यांचा समावेश आहे. या चमूने आज पातूर तालुक्यातील ६५ कामांची पाहणी केली असून, सोमवारपासून मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी तालुक्यातील कामांची पाहणी करणार आहे.यामुळे जलयुक्तचे खरे स्वरूप कळणार आहे.

Web Title: Third Party Inspection of 'Jalukta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.