तीसऱ्या टप्यात १७४ विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Published: April 3, 2017 08:35 PM2017-04-03T20:35:11+5:302017-04-03T20:35:11+5:30

२५ टक्के प्रवेश देण्यासाठी तीसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १७४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

In the third phase, 174 students were admitted | तीसऱ्या टप्यात १७४ विद्यार्थ्यांना प्रवेश

तीसऱ्या टप्यात १७४ विद्यार्थ्यांना प्रवेश

Next

पालकांना आॅनलाइन यादी पाहण्याचे आवाहन

अकोला: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार २५ टक्के प्रवेश देण्यासाठी तीसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १७४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पालकांनी शिक्षण विभागाच्या एसएमएसची प्रतिक्षा न करता आॅनलाइन यादीत नावाची खात्री करून १० एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमातील कलमानुसार दुुर्बल, वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील १९३ शाळांची नोंदणी झाली. त्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी शाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे अर्ज आहेत. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाच्या दोन सोडती काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीसरी सोडत सोमवारी काढण्यात आली. त्यामध्ये १७४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळांचा पर्याय देण्यात आला आहे. त्याबाबतचा एसएमएस तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाइलवर प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पालकांनी ज्याठिकाणी आॅनलाइन अर्ज भरला, त्याचठिकाणी प्रवेशपत्राची प्रिंट काढावी, ती मुख्याध्यापकांकडे घेऊन जावी, या सोडतीमध्ये प्रवेशाची शाळा निश्चित झालेल्यांनी १० एप्रिलपर्यंत प्रवेश घेणे आवश्यक आहे. त्यानंतरही रिक्त असलेल्या जागांचा अहवाला शाळांना शिक्षण विभागाला सादर करावा लागणार आहे, असे दिग्रसकर यांनी शाळांना बजावले आहे.

Web Title: In the third phase, 174 students were admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.