'अनलॉक'चा तिसरा टप्पा आजपासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:24 AM2020-06-08T10:24:06+5:302020-06-08T10:24:18+5:30

‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सोमवार, ८ जूनपासून करण्यात येणार आहे.

The third phase of 'Unlock' from today! | 'अनलॉक'चा तिसरा टप्पा आजपासून!

'अनलॉक'चा तिसरा टप्पा आजपासून!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्यासंदर्भात शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार ‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सोमवार, ८ जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह आंतरजिल्हा बस वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे.
‘अनलॉक’च्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील सर्व प्रकारची खासगी कार्यालये त्यांच्याकडे असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्क्यांपर्यंत कर्मचाºयांचा वापर करता येणार आहे. परवानगी असलेल्या उपक्रमास शासकीय परवानगीची आवश्यकता राहणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त २ प्रवासी, तीनचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक २ प्रवासी व दुचाकीवर केवळ चालकलाच परवानगी राहणार आहे. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह ‘फिजिकल डिस्टनन्सिंग’ व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहणार आहे. दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. तथापि, दुकानांमध्ये अथवा संबंधित ठिकाणी जास्त गर्दी होत असल्याचे दिसून आल्यास मनपा आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी व ग्रामपंचायत सचिवांकडून संबंधित दुकाने व बाजारपेठ बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.


व्यायामासाठी मैदाने खुली; सांघिक खेळ खेळण्यास मनाई!
स्पोर्ट कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने व इतर सार्वजनिक ठिकाणे व्यक्तिगत व्यायामासाठी खुली राहणार असून, प्रेक्षकांना एकत्र येण्यास व सांघिक खेळ खेळण्यास मनाई राहणार आहे.

‘अनलॉक’च्या तिसºया टप्प्याची सोमवारपासून जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ‘मास्क’चा वापर करून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी

 

 

Web Title: The third phase of 'Unlock' from today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला