तिसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन खामगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 03:49 PM2018-11-18T15:49:46+5:302018-11-18T15:50:10+5:30
अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे.
अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिक नवनाथ मोरे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी तेजेंद्रसिंग चौहाण यांची निवड झाली आहे, अशी माहिती संमेलनाचे संयोजक अरविंद शिंगोडे यांनी दिली.
जिल्हा परिषद विश्रामगृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिंगोडे यांनी साहित्य संमेलनाची माहिती दिली. संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी सृजन साहित्य संघाच्या अकोला जिल्हाध्यक्ष कवियत्री वनिता गावंडे यांची निवड करण्यात आली. यंदाचे तिसरे वर्ष असून पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दुर्गेश सोनार तर दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद युवा कवी किशोर बळी यांनी भुषविले होते. या साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी प्रतिभावान युवक युवतींचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या साहित्य संमेलनात पर्यावरण विषयावर विचारमंथन होणार आहे.
संमेलनाध्यक्ष गोरे यांचा परिचय
युवा साहित्यिक नवनाथ गोरे हे निगडी बुद्रूक जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत. त्याच्या फेसाटी या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त झाले आहे. या कादंबरीस युवा साहित्य अकादमीचा सन २०१८ चा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. फेसाटी कादंबरीस अनेक राज्य-राष्ट्रीयस्तर सन्मान प्राप्त झाले आहेत. जळगाव येथील संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कादंबरीचा समावेश करण्यात आला आहे. बौध्द तत्वज्ञानाचा मराठी संत कवितेवरील प्रभाव या बृहद संशोधन प्रकल्पावर संशोधन केले आहे.