सिटी बस सेवेचे तीनतेरा; महापालिकेला मुहूर्त सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:22+5:302021-08-15T04:21:22+5:30

अकाेलेकरांना सिटी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात बस वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. उत्पन्न अन् ...

Thirteen of the city bus service; Municipal Corporation could not find a moment! | सिटी बस सेवेचे तीनतेरा; महापालिकेला मुहूर्त सापडेना !

सिटी बस सेवेचे तीनतेरा; महापालिकेला मुहूर्त सापडेना !

Next

अकाेलेकरांना सिटी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात बस वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळवणे श्रीकृपा ट्रॅव्हल्सला शक्य होत नसल्यामुळे सिटी बससेवा बंद करण्यात आली. वर्तमानस्थितीत बस सेवेचे तीनतेरा वाजले असून ही सेवा सुुरु करण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडत नसल्याने अकाेलेकरांची गैरसाेय हाेत आहे. बस उपलब्ध असतानाही त्या नागरिकांच्या सेवेत नसल्याने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सन २००१ मध्ये मनपाची स्थापना झाल्यानंतर २००४ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेने शहरात पहिल्यांदा बससेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. या बससेवेला २०१३ पर्यंत घरघर लागली आणि प्रशासनाने ही बससेवा बंद केली. २०१४-१५ मध्ये मनपात सत्तापरिवर्तन होताच भाजपने सिटी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार केला. शहरात परवाना नसलेले असंख्य ऑटाे धावतात. यामुळे सिटी बससेवेला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने चालक-वाहकांचे वेतन अदा करणे अवघड हाेत असल्याचा दावा करीत श्रीकृपा ट्रॅव्हल्सने २०१९ मध्ये बस वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

करारनामा ३५ बसचा; दाखल झाल्या २०

सन २०१७ मध्ये मनपाने ३५ सिटी बससाठी निविदा प्रसिद्ध केली हाेती. श्रीकृपा ट्रॅव्हल्सची निविदा मंजूर करण्यात आली. सुरुवातीपासूनच या एजन्सीच्या आर्थिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले हाेते. पहिल्या टप्प्यात ५ सिटी बस आणल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जानेवारी २०१८ मध्ये १५ बस आणण्यात आल्या. त्यातही दाेन बस नादुरुस्त असल्याची सबब सांगत १८ बस सुरु केल्या. अवघ्या दाेनच वर्षांत श्रीकृपा ट्रॅव्हल्सने बस सेवेला रामराम ठाेकला.

सर्वसामान्यांची गैरसाेय

काेराेनाच्या कालावधीत ऑटाे चालकांनी अव्वाच्या सव्वा दर आकारले आहेत. सर्वसामान्य अकाेलेकरांची आर्थिक पिळवणूक पाहता मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी बंद पडलेल्या सिटी बस सेवेला प्रारंभ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Thirteen of the city bus service; Municipal Corporation could not find a moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.