साडेचार हजार विद्यार्थ्यांंनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा
By admin | Published: October 12, 2015 01:50 AM2015-10-12T01:50:56+5:302015-10-12T01:50:56+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) लिपिक टंकलेखक पदांसाठी परिक्षा; ५७0 विद्यार्थी गैरहजर.
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) लिपिक टंकलेखक पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील २0 केंद्रांवर ४ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, उर्वरित ५७0 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, भारत विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, जागृती विद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, नोएल स्कूल, श्री शिवाजी विद्यालय हरिहरपेठ, राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय, स्वावलंबी विद्यालय, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, बी.आर. हायस्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, गुरुनानक विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट, मेहरबानू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, महाराष्ट्र माध्यमिक शाळा व मनुताई कन्या शाळा या २0 केंद्रांवर 'एमपीएससी'ची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ५ हजार ३१५ विद्यार्थ्यांंनी ह्यएमपीएससीह्ण परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी ४ हजार ७४५ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली असून, उर्वरित ५७0 विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. एमपीएससी परीक्षेच्या कालावधीत शहरातील परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.