साडेतीन हजारांवर उमेदवार रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:44 AM2017-09-28T01:44:20+5:302017-09-28T01:44:33+5:30

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत  (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रा.पं.  सदस्यांच्या माघारीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.  सर पंच पदांसाठी ८९९ तर सदस्यपदासाठी २६५५ उमेदवार रिंगणात  आहेत.

Thirty-three thousand candidates in the fray | साडेतीन हजारांवर उमेदवार रिंगणात!

साडेतीन हजारांवर उमेदवार रिंगणात!

Next
ठळक मुद्दे२७२ ग्रामपंचायतींची निवडणूक ८00 च्या वर उमेदवारांची माघार

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत  (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रा.पं.  सदस्यांच्या माघारीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.  सर पंच पदांसाठी ८९९ तर सदस्यपदासाठी २६५५ उमेदवार रिंगणात  आहेत.

उमेदवारांच्या लढती निश्‍चित!
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  पदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, २७  सप्टेंबर रोजी दुपारी निवडणूक रिंगणात उतरलेल्या गावागावां तील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या निवडणूक लढती निश्‍चित झाल्या.  सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उ तरलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येणार  आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप!
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत  सदस्य पदांची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक  चिन्हांचे वाटप २७ सप्टेंबर रोजीच संबंधित तहसील कार्यालयात  करण्यात आले. मिळालेल्या चिन्हांवर संबंधित उमेदवार  निवडणूक लढविणार आहेत.

Web Title: Thirty-three thousand candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.