रेल्वे रूळ परिसरातील नागरिकांची कसून चौकशी

By admin | Published: March 7, 2017 02:25 AM2017-03-07T02:25:10+5:302017-03-07T02:25:10+5:30

नागरिकांचे नोंदविले बयान; जीआरपी लागली कामाला.

A thorough investigation of citizens in the Rail Rul area | रेल्वे रूळ परिसरातील नागरिकांची कसून चौकशी

रेल्वे रूळ परिसरातील नागरिकांची कसून चौकशी

Next

अकोला, दि. ६- अकोला ते शेगाव रेल्वे रुळावर अकोट फैल पुलाखाली रेल्वे इंजीन बदलण्याच्या ठिकाणावर रेल्वे इंजीनमधील अग्निरोधक यंत्र काढून ते रुळावर टाकल्यानंतर तपास यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे. रेल्वे रुळावर घडलेल्या या प्रकारामुळे जीआरपीने अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. जीआरपीचे प्रमुख सम्युअल वानखडे यांनी सोमवारी या परिसरातील काहींचे बयान नोंदविले असून आणखी काही जणांची चौकशी करून त्यांचे बयान नोंदविण्यात येणार आहेत.
रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर इंजीन बदलण्यासाठी ह्यआउटरह्ण आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजून ७ मिनिटांनी या ठिकाणावर रेल्वेचे इंजीन उभे असताना अज्ञात व्यक्तीने इंजीनमधील अग्निरोधक यंत्र बाहेर काढले आणि रुळावर फेकले होते. अज्ञात व्यक्तीने घातपात म्हणा किंवा खोडसाळपणे इंजीनमधील अग्निरोधक यंत्र रुळाच्या बाजूला फेकले होते. त्यामुळे हे अग्निरोधक यंत्र दगडावर पडल्याने ते पंर झाल्याने यामधील द्रवाची गळती झाली. रेल्वे रुळावर तेही अकोट फैल पुलाखाली हा प्रकार घडल्याने अकोला पोलीस प्रशासनासह दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक, नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, जीआरपी, आरपीएफचे धाबे दणाणले होते. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेचा शोध सुरू केला आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे उघड झाले आहे.
पायलटची हलगर्जी; पोलीस यंत्रणा कामाला
रेल्वे इंजीन बंद न करता तसेच बाहेर फिरणार्‍या पायलटच्या हलगर्जी कारभारामुळे हा प्रकार घडला. सदर पायलट आरामात आहे; मात्र या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दहशतवादविरोधी पथकासह अकोला पोलीस आणि जीआरपी पोलीस आता रात्रंदिवस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत.
आरपीएफचे दुर्लक्ष
आरपीएफ कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला; मात्र आरपीएफच्या एकाही कर्मचार्‍याला हा प्रकार दिसला नाही. रात्री २ वाजेची वेळ असल्याने आरपीएफचे जवान आणि अधिकारी गस्त सोडून झोपेत असल्याची माहिती आहे.

अकोट फैल पुलाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे सखोल चौकशी करण्यात येत आहे. आजूबाजूच्या नागरिकांचे बयान नोंदविण्यात आले आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असून पोलीस त्या दिशेने काम करीत आहेत.
- सम्युअल वानखडे
ठाणेदार, जीआरपी

Web Title: A thorough investigation of citizens in the Rail Rul area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.