शेगाव रेल्वे स्थानकावर कसून चौकशी
By Admin | Published: August 9, 2016 02:21 AM2016-08-09T02:21:49+5:302016-08-09T02:21:49+5:30
इसिसच्या धमकीपत्राची पृष्ठभूमीवर शेगावात पोलिसांद्वारे चोख बंदोबस्त.
शेगाव (जि. बुलडाणा): संत गजानन महाराजांचे मंदिर आणि रेल्वे स्थानक परिसरासह न्यायालय बॉम्ब स्फोटाने उडविण्याची धमकी जळगाव खांदेश येथील जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे देण्यात आली. या पृष्ठभूमीवर सोमवारी रेल्वे स्थानकावरील प्रवासी आणि रेल्वे गाड्यांची कसून चौकशी करण्यात आली.
शेगाव रेल्वे स्थानक आणि मंदिर उडवून देण्याच्या एका धमकीपत्रानंतर प्रशासन खळबडून जागे झाले आहे. यामध्ये श्रींच्या मंदिरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून सोमवारी शेगाव रेल्वे सुरक्षा बलाद्वारे संशयीत प्रवाशांची चौकशी करण्यात आली.
स्वतंत्र दिन आणि शहरात मंगळवारी येणार्या श्रींच्या पालखीच्या पृष्ठभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.