'त्या' चार आरोपींना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: June 29, 2016 12:20 AM2016-06-29T00:20:20+5:302016-06-29T00:20:20+5:30
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असलेल्या चार आरोपींना दंगा काबू पथकाने केली होती अटक.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत शंकर माळा, परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असलेल्या चार आरोपींना दंगा काबू पथकाने अटक केली होती. एका दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर २८ जून रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मंठा पोलिसांना ३७६ कलमाखाली हवा असलेला आरोपी शे.शफी शे.शब्बीर हा सहा महिन्यांपासून फरार होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. औरंगाबाद जिल्ह्यात एका घटनेत एटीएसच्या ताब्यात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहाय्याने एटीएसचे पोलीस उपअधीक्षक शिवाजी ठाकरे यांना लाच घेताना पकडून दिले होते. यामुळे त्याची दहशत निर्माण झाली होती. त्यांच्या या कृत्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. काल सकाळी अटक करण्यात आलेल्या शे.शफी शे.शब्बीर, शे.जब्बार शे.जईनउद्दीन, सय्यद सोहील सय्यद नजीर आणि महेश जगन गारी यांना सिंदखेडराजा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उमेश भोसले, किनगावराजाचे ठाणेदार देवानंद वानखेडे करीत आहेत.