‘त्या’ दोन मद्यपी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

By admin | Published: July 8, 2016 12:17 AM2016-07-08T00:17:20+5:302016-07-08T00:17:20+5:30

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील घटना.

'Those' two alcoholic employees have been booked | ‘त्या’ दोन मद्यपी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

‘त्या’ दोन मद्यपी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

Next

कारंजा लाड (जि. वाशिम) : कारंजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ह्यत्याह्ण दोन कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने गुरुवारी कारंजा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. प्रभारी दुय्यम निबंधक संजय इंगळे व लिपिक राजू झळके, असे गुन्हे दाखल झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. २८ जून रोजी कारंजा दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक व लिपिकाने कार्यालयातच मद्य प्राशन केले होते. वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथील अहवाल ६ जुलै रोजी प्राप्त झाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन यांनी ७ जुलै रोजी कलम ८५, १ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये प्रभारी दुय्यम निबंधक संजय एकनाथ इंगळे (वय ४७) रा. अकोला, कनिष्ठ लिपिक राजू रंगराव झळके (वय ४0) रा. कारंजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 'Those' two alcoholic employees have been booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.