‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:32 PM2019-08-03T13:32:05+5:302019-08-03T13:32:09+5:30
विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
संतोष येलकर,
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ देण्यासाठी राज्यात शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. विशेष मोहिमेच्या पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांकडून अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना लवकरच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात येणार आहे.
७२०८ अर्जांची पडताळणी पूर्ण!
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या २७ हजार ४२७ अर्जांची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी २ आॅगस्टपर्यंत ७ हजार २०८ अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न-धान्याचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ आॅगस्टपर्यंत लाभार्थ्यांकडून २७ हजार ४२७ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, पडताळणीनंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अन्न -धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.
-बी.यू.काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.